बीड : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आंबाजोगई येथे आयोजित सभेत मंत्री धंनजय मुंडे यांनी बोलताना भाजप नेत्यांना लक्ष्य करून तुफान फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळी फोडाफोडी करणाऱ्या भाजपला आम्ही सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करू नका. पण सुधारणार नाहीत. आता ‘पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है,’ असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.
यासोबतच त्यांनी, ‘महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मला एकानं लोकशाही काय आहे, असा प्रश्न विचारला होता. मी त्याला म्हणालो, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या देशाला लोकशाही दाखवली आहे. ५६ आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, ४४ आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि १०५ आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, याला लोकशाही म्हणतात. पवारसाहेबांनी हे दाखवून दिलं असून कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे,’ असं म्हणत भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहुन साहेबांवर बोलावं’
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- वीजबिल माफ न केल्यास सरकारला पळता भूई करून सोडू – कर्णबाळा दुनबळे
- चार खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा नेता लोकनेता कसा ? पडळकरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
