पुणे : अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे उर्फ गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.
परंतु या प्रकरणामुळे अटकेच्या भीतीने गजा मारणे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली असून ती त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
बेकायदा जमाव जमवून मिरवणूक काढल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदा जमाव जमवला, सरकारी कामात अडथळा आणला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकेच्या भीतीने मारणे फरार झाल्याचे पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी वारजे माळवाडी पाोलीस स्टेशन, कोथरुड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना इतक्या वेळा कोरोना होतोच कसा याचं संशोधन झालं पाहिजे – महाजन
- सरकारी कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक गाडी बंधनकारक करणार-गडकरी
- मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार ? ; ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत
- लातूरमध्ये जनावरांसाठी मोबाईल दवाखाने’
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी


