Share

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार ? ; ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले.

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.

“कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मास्क लावणं, गर्दी टाळणं, हे नियम नागरिकांनी पाळावेत.

लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!