नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. पेट्रोल तर इतिहासात पहिल्यांदा शंभराच्या घरात पोहोचले आहे. काही ठिकाणी तर झालेही आहे. यामुळे वाहनधारकांचे पार कंबरडे मोडले आहे. आणि अशातच केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सरकारी मंत्रालये आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची गरज असल्याचं नितिन गडकरी यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, मी माझ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांनाही त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची सूचना गडकरी यांनी केली.
असे केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल असा दावा गडकरी यांनी केला. स्वयंपाकाच्या गॅस ऐवजी इलेक्ट्रिक कुकींग साहित्यासाठी सरकारने अनुदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गॅसपेक्षा इलेक्ट्रिक कुकिंग पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यात फिरते पशु वैद्यकीय दवाखाने उपलब्ध; आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण
- “चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली”
- ‘मंत्री संजय राठोड गायब का?’, तृप्ती देसाईंची पूजा चव्हाणच्या घरी भेट
- अब्दुल कलाम हा वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता ; मोदींना श्रेय देऊ नये
- शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिट करून आठवड्यात आराखडा सादर करा: जिल्हाधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

