लातूर : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागा अंतर्गत मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला एक फिरता पशुवैद्यकिय दवाखाना देण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील लातूर ग्रामीण, देवणी व औसा तालुक्यासाठी तीन फिरते पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर झालेले आहे. याच फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले.
यावेळी आमदार देशमुख यांनी या फिरत्या दवाखान्यात उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली व संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हे दवाखाने कशा पद्धतीने काम करणार आहेत याची माहिती घेतली. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशूंना चांगल्या आरोग्य सुविधा अत्यंत तत्परतेने उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश यावेळी आमदार देशमुख यांनी दिले. यावेली आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते फीत कापून व हिरवी झेंडी दाखवून पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी औसा, लातूर ग्रामीण व देवणी तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे असी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. तसेच पुढील काळात प्रत्येक तालुक्यासाठी एक फिरते पशुवैद्यकीय दवाखाने मिळणार असल्याचं ही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. पडिले, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यासह पशु संवर्धन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी
- “चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली”
- ‘मंत्री संजय राठोड गायब का?’, तृप्ती देसाईंची पूजा चव्हाणच्या घरी भेट
- अब्दुल कलाम हा वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता ; मोदींना श्रेय देऊ नये
- शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिट करून आठवड्यात आराखडा सादर करा: जिल्हाधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

