Share

एकनाथ खडसेंना इतक्या वेळा कोरोना होतोच कसा याचं संशोधन झालं पाहिजे – महाजन

Published On: 

जळगाव : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. राज्यातील तब्बल ४ मंत्री कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एक्नाठ्खाद्से यांना तर तिसऱ्यांदा कोरोणा झाल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.

यावर आता माजी जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांना कोरोनाची तिसऱ्यांदा लागण झाली आहे. त्यामुळे ते सध्या क्वारंटाईन आहेत. पण एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने हा चिंतेचा विषय आहे आणि यावर संशोधन झाले पाहिजे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबरमध्ये ट्विट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ईडीच्या चौकशीच्या दिवशी आपल्याला कोरोना सदृश लक्षणं जाणवत असल्याने डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे, असे सांगत खडसे १४ दिवस क्वारंटाईन जाले होते. तर आता १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

एकनाथ खडसे यांना पहिल्यांदा कोरोना झाल्याचे ट्विट

एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना सदृश्य लक्षण असल्याचे ट्विट

एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोना झाल्याचे ट्विट

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!