Share

बहुचर्चित पोलीस अधिकारी सुजाता पाटील लाच घेताना अटक

Published On: 

मुंबई : राज्य पोलीस दलातून एक खळबळ उडवून देणारी गोष्ट समोर आली आहे. मेघवाडी विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक केली आहे. तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती. ४० हजारांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलीस दलातील लाचखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, बदली करताना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करणे किंवा राजीनामा देणे, हेच पर्याय असल्याचे पत्र हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी असताना सुजाता पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी पाठवली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी सुजाता पाटील यांनी केल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!