Share

अमृता फडणवीस, करुणा शर्मांसह अनेकांची बदनामी; पुणे पोलिसांची कारवाई

Published On: 

पुणे : राजकीय नेत्यांबाबत सोशल मीडियावर अपशब्द वापरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, करुणा शर्मा यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत ज्ञानेश्वर बडे (२८), मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, राहुल मुळे या तरुणाने समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकाराच्या पोस्ट सोशल माध्यम म्हणजेच फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. धनंजय मुंडे, करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अनिल देशमुख, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार या नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरु होता.

राहुल मुळे याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन मुंडे व शर्मा यांच्यासह अन्य महिलांबाबत फेसबुकवर सातत्याने वेगवेगळ्या अश्लिल भाषेमध्ये मजकूर टाकला होता. त्याच्या मजकुरावर कमेंट देणाऱ्याबाबतही अश्लिल भाषेत तो कमेंट करत होता. यावरून ज्ञानेश्वर बडे यांनी राहुल मुळे याच्या विरोधात दिली. त्या तक्रारीनुसार पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!