Share

साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र

Published On: 

नवी दिल्ली : मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. साकीनाक्यामध्ये शुक्रवारी झालेल्या या अत्याचार प्रकरणात मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता. अत्याचार केल्यानंतर या नराधमाने पीडितेवर चाकूने वार देखील केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा अशा आशयाचं पत्र राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे.

‘साकीनाका अत्याचार पीडितेचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. पोलीस सर्व आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. या घटनेची सुमोटो दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्ताकडे करण्यात येत आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना लागेल ती मदतही पुरवण्यात यावी अशीही विनंती करण्यात येत आहे असे शर्मा यांनी सांगितले.

तसेच ‘साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणात मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेत. फक्त एका आरोपीला अटक झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत तपासात प्रगती झाली नाही, तर मी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम पाठवेन. पीडित महिलेच्या कुटुंबलाही आम्ही मदत करु’ असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!