🕒 1 min read
नवी दिल्ली : गुगल क्रोमची सिक्योरिटी वाढवण्यात येणार असल्याने आता यामुळे युजर्सचा हार्मफुल डाउनलोड किंवा एक्सटेंशनपासूनही सुरक्षित राहू शकणार आहे. यासाठी नवं फीचर जारी केलं असून हे नवं फीचर Enhanced Safe Browsing चा एक भाग आहे. या फीचरद्वारे हार्मफुल डाउनलोड किंवा एक्सटेंशनबाबत Chorme माहिती करू शकतो. हे फीचर गेल्या वर्षी सुरक्षित ब्राउजिंगसाठी लाँच करण्यात आलं होतं. आता या फीचरमध्ये आता एडिशन प्रोटेक्शन दिलं जात आहे.
गुगल क्रोम रिस्की फाईल डाउनलोड करण्यावेळी Enhanced Safe Browsing मुळे अधिक प्रोटेक्शन ऑफर करेल. तसेच एक स्कॅनिंग टूलही लाँच केलं जाईल. याच्या मदतीने डाउनलोडिंगच्या आधीच धोकादायक फाईलची सूचना मिळेल. अशात जर तुम्ही Chorme वेब स्टोरवरुन नवं एक्सटेंशन इन्स्टॉल कराल, त्यावेळी डायलॉग बॉक्स दिसेल, जो सांगेल की जे एक्सटेंशन तुम्ही इन्स्टॉल करत आहात, ते सुरक्षित आहे की नाही.
अधिक एनालिसिससाठी Google Safe Browsing वर फाईल अपलोड केली जाईल. जर फाईल अनसेफ असेल, तर गुगल याबाबत इशारा देईल. हे पर्यायी आहे, युजर्स स्कॅन न करताही फाईल डाउनलोड करू शकतात.
कंपनीने गुरुवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की Chrome 91 पासून सुरू होऊन आम्ही चांगल्या सुरक्षित ब्राउजिंगसाठी युजर्सला आपलं एक्सटेंशन निवडण्यास मदत करण्यासाठी नवीन सुविधा रोलआउट करत आहोत. ced Safe Browsing युजर्सला इतर ब्राउजिंगच्या तुलनेत ३५% अधिक सिक्योर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची अन्यायी दरवाढ; मराठवाड्यात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन!
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
