Share

सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून नोटीस; बच्चू कडूंचा केंद्रावर निशाणा

Published On: 

अमरावती : अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट केंद्रावर निशाणा साधत टीका केली आहे.

ईडी एक स्वतंत्र संस्था असून त्याचे महत्व केंद्राने कमी तर केलेच शिवाय आपल्या सोईनुसार त्याचा वापर सुरु असून अशा कारवाईमुळे आता वेगळे काहीच नाही अशी टिका बच्चू कडू यांनी केली आहे. देशातील सर्व पक्ष बंद करुन एकाच पक्षाचा आणि एकाच व्यक्तीचा देश करण्याकडे केंद्राचा कल असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान ईडीकडून नुकतेच यंग इंडिअनमध्ये आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्यामुळे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. यालाच नॅशनल हेराल्ड स्वामित्व हक्क प्राप्त आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वित्त शोध निवारण अधिनियमच्या गुन्हेगारी कलमान्वये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांचीही चौकशी करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!