पुणेः राज्यभर गाजलेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणविसांना चौकशीसाठी बोलविले आहे.
ही नोटीस मुंबई पोलिसांनी कलम 160 अंतर्गत दिली आहे, त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होताच यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, असे सांगितले आहे. या प्रकरणासंदर्भात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

