लातूर : जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील शिरूर अनंतपाळ येथील १५० उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्च न दाखवल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा आणि भादंविनुसार कारवाई करण्यात येईस, असा इशारही देण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणूकीत २२९ जागांसाठी ५९९ उमेदवारांनी नामांकनअर्ज दाखल केले. यापैकी ५ अर्ज अवैध आणि ११८ उमेदवारांनी नामाकंन मागे घेतल्यामुळे ४७६ उमेदवार निवडणुकीत उतरले. पण २७ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे शेवटी ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणूक लढविणाऱ्या निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीचा दैनंदिन खर्च निवडणूक विभागाच्या खर्च पथकाकडे सादर करावे, असे निर्देश तहसील प्रशासनाच्या वतीने दिले होते.
त्यानुसार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक निकाल लागल्यानंतर जवळपास ३०० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब खर्च पथकाकडे सादर केला आहे. परंतु, अद्यापही १५० उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल न केलेल्या १५० उमेदवारांना दुसऱ्यांदा नोटिसा देण्यात आल्या आहेत. निवडणुकीचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर न करणाऱ्या संबंधित उमेदवारावर निवडणूक आयोग आणि भारतीय दंड संहितेचे कलम १७१ इ नुसार कारवाई करण्यात येईल,असा इशारा १५० उमेदवारांना दुसऱ्यांदा नोटिस द्वारे देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पण महिला सक्षमीकरणाच्या युगात हे काय होत आहे माननीय महोदय ?’
- “एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले”, दिशांच्या अटकेनंतर पेटले राजकीय वातावरण
- पूजा चव्हाण प्रकरणात तपास करणारे पोलीसच दबावात आहेत ?
- बेरोजगार तरुणांना बिझनेस सुरू करायचा असेल तर सोनू सूद करणार मदत
- बीटकॉईनच्या आमिषाने आंतरराष्ट्रीय भामट्यांनी व्यापाऱ्यास घातला गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
