Share

RCB संघात निवड न झाल्याने  क्रिकेटपटूने नाही तर ‘या’ फुटबॉलरने व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या  इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी केनने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

यंदा आयपीएलच्या हंगामासाठी विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लिलावाआधी केवळ १२ खेळाडूंना संघात कायम केले आहे, तर एकूण १० खेळाडूंची संघातून मुक्त करण्यात आले आहे. याबाबत आरसीबीने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर हॅरी केनने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

हॅरी केनने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवड न झाल्याने दुःखी झाला आहे. हॅरी केन म्हणाला, आपली  ‘संघान निवड न झाल्याने थोडा नाराज झालो. पण आता काही करु शकत नाही. तुम्हाला मी यानंतरही प्रोत्साहन देत राहिल.’

खरंतर हॅरी केन हा फुटबॉलपटू जरी असला तरी तो क्रिकेटचा देखील चाहता आहे. तसेच तो भारतीय संघाचा प्रशंसकही आहे. त्याच्यात आणि भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीमध्ये चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे त्याने काही महिन्यांपूर्वी स्वत: क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला आरसीबी संघात घेण्याबद्दल मजेने विचारले होते. त्यावर विराटने उत्तर दिले होते की ‘छान खेळलास मित्रा, तू काऊंटर ऍटॅकींग फलंदाज म्हणून खेळू शकतोस.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!