Share

भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही- सचिन सावंत 

Published On: 

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणा-या भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही असे म्हणत सुशांत सिंह जन्म दिनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचा निषेध केला.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला. महाराष्ट्राची बदनामी करून बिहार विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्याकरिता त्याचा उपयोग केला.

या प्रकऱणात मुंबई पोलिसांसारख्या अत्यंत कर्तबगार संस्थेची बदनामी गुप्तेश्वर पांडेसारख्या व्यक्तीकडून करवली गेली. महाराष्ट्रातील नेत्यांना या प्रकरणात गोवून बदनाम करण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला गेला. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन तीन तपास यंत्रणा या प्रकरणात आणून तपासातील तपशील लीक करण्यात आले. सोशल मीडियावर लाखो बोगस फेसबुक आणि ट्वीटर अकांऊट उघडून सुशांत सिंहची हत्याच झाली आहे अशा वावड्या उठवण्यात आल्या.

याकामी टीआरपी घोटाळ्याचा आरोप असलेल्या एका कुख्यात वाहिनीची मदतही घेण्यात आली. अद्यापही ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तिन्ही तपास यंत्रणांच्या हाती काहीही लागले नाही. मुंबई पोलिसांचा तपास व्यावसायिक पद्धतीने व प्रामाणिकपणे चालला होता हे सर्वोच्च न्यायालयाचे मत योग्य होते हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अद्यापही सीबीआय का गप्प आहे? असा प्रश्न उपस्थित करून सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या हीन राजकारणाचा तीव्र निषेध केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!