Share

#WorldCup2011 : केवळ विश्वचषक नव्हे तर टीम इंडियाने जगभरातील क्रिकेट रसिकांची मनेही जिंकली होती

Published On: 

पुणे – भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर चषक उंचावला होता.

अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरेल झहीर खान, गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह धोनी होय. झहीरने गोलंदाजीत तर धोनी आणि गंभीरने फलंदाजीत शानदार कामगिरी करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. संपूर्ण मालिकेत युवराज सिंग भारताचा हिरो ठरला होता.अश्या कित्येक आठवणी आज देखील भारतीयांच्या मनात आज दाटून आल्या आहेत.

जिगरबाज खेळ करत केवळ विश्वचषक नव्हे तर धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगभरातील क्रिकेटरसिकांची मनेही जिंकली होती.२०११ तील वर्ल्ड कपच्या विजयी जल्लोषाच्या आठवणींना उजाळा देताना तो जल्लोष अविस्मरणीय आहे, त्या विजयाच्या खुप आठवणी आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत जयंत पाटील यांनी आजच्या दिवशी वर्ल्ड कपच्या आठवणी आपल्या ट्विटद्वारे जाग्या केल्या आहेत.

आजच्या दिवशी २ एप्रिल २०११ रोजी टीम इंडियाने कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्या गोष्टीला १० वर्ष उलटली आहे म्हणून #WorldCup2011 हा हॅशटॅग ट्रेंड चालवत नेटिझन्स त्या दिवशीच्या आठवणींना उजाळा देत आहे. जयंत पाटील यांनी धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगभरातील भारतीयांची मने जिंकली अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!