पुणे : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर (शिळा मंदिर) लोकार्पण सोहोळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणा नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. समाजात ज्या काळात नैराश्य होते, जेव्हा समाजाला भागवतधर्माच्या मार्गावर नेण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलींनी केले आणि त्यावर कळस चढविण्याचे काम जगदगुरु तुकाराम महाराज यांनी केले, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माऊलींनी जो अखिल विश्वाचा विचार आपल्याला दिला, त्याच मार्गावर आज देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला मदत करण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्त्वात झाले.”
“वारकर्यांचा धर्म काय आहे? सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास! वारकर्यांच्याच या ब्रिदावर आज देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज वारकर्यांच्या भूमिकेतूनच काम करीत आहेत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या धर्मग्रंथात मानव जन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असल्याचे सांगितले आहे. संतांची कृपा झाली तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज या पवित्र तीर्थक्षेत्र देहूवर येताना मलाही तेच वाटत आहे. देहूचे शिला मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्र नाही तर भारताचे सांस्कृतिक भविष्यही प्रस्तापीत करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो.”
“छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रीय नायकाच्या आयुष्यातही तुकारामजींसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली, वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली. तेव्हा तुरुंगात ते हातकडी वाजवत तुकारामजींचे अभंग म्हणत असत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, “आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. म्हणूनच, आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचे पर्याय बनत आहेत. तेव्हा विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे जातील याची आम्ही काळजी घेत आहोत.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

