Share

टिव्हीवर नाही पण ‘या’ ऍपद्वारे पाहता येणार भारत-इंग्लंड सामने?

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

डोळ्यात तेल टाकून क्रिकेट रसिक भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यांची वाट पाहात आहेत. ४ सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघ्या आठवड्याभराचा कालावधी उरला आहे. मात्र अद्यापही ब्रिटिनचे चाहते कोणत्या टिव्ही चॅनलवर भारत-इंग्लंड सामने पाहू शकतील? याचा निर्णय झालेला नाही. क्रिकेट सामन्यांचे अधिकृत प्रसारक स्टार इंडिया हॉटस्टार ऍपद्वारे या सामन्यांचे थेट प्रसारण करण्याच्या विचारात आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील थरारक विजय सोबतच इंग्लंडने श्रीलंकाचा केलेला व्हाईटवॉश यामुळे स्काय स्पोर्ट्स चॅनलवरील दर्शकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे प्रसारक स्टार इंडिया स्काय स्पोर्ट्स चॅनलला भारत-इंग्लंड सामन्यांचे अधिकार विकण्याची शक्यता वाढली आहे. तसेच चॅनल ४ देखील याबाबत प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. या अधिकारांची किंमत जवळपास २ कोटी पौंड इतकी आहे.

स्काय स्पोर्ट्स चॅनल हे अधिकार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मागील २ दशकांपासून इंग्लंडच्या अधिकतर सामन्यांचे प्रसारण स्काय स्पोर्ट्स चॅनलवर करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, नक्की स्टार इंडिया कोणत्या टिव्ही चॅनलला भारत-इंग्लंड सामन्यांचे थेट प्रसारण करण्याचे अधिकार देईल?

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!