Share

‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा

Published On: 

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. कोरोना लसीकरण आणि रेमडेसिवीर इंजेक्शनवरून सुरू झालेला हा मुद्दा आता आरोप प्रत्यारोपांवर येऊन ठेपला आहे. सोशल मीडियाद्वारे हे दोघेही एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच काल बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत असल्याची माहिती दिली. त्यापैकी परळी मतदारसंघासाठी तीन हजार इंजेक्शन मिळणार आहेत. त्यातील काही इंजेक्शन हे धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानमार्फत गरजू रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. याचा सर्व खर्च मंत्री मुंडे हे करणार आहेत. मात्र, ही बाब पंकजा मुंडे यांना खटकल्याचे दिसत आहे. कारण, त्यांनी यावरून धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

सोशल मीडियातून पंकजांनी एक आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, रेमडेसिवीर किंवा लसी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी यापुढे वाटू नये. आरोग्य यंत्रणेचे चॅनल सशक्त करणे, विश्वासार्हता वाढवणे, सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. पैसा व सामाजिक वजन वापरुन प्रसिद्धीसाठी लोक वाटप करतात. हे आजच्या नाजूक परिस्थितीत योग्य नाही. समाज कार्यासाठी इतर मार्ग आहेत असा टोला पंकजांनी लगावला आहे.

शिवाय, रात्रंदिवस स्वतःहून अधिक समाजाच्या सेवेसाठी झटणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांच्या विषय सन्मान ठेवून त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप नको असे आवाहनही पंकजांनी केले आहे. तसेच रेमडेसिवीर आणि लसीचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी ट्विटमधून केली आहे. दरम्यान, काल शुक्रवारी दिवसभर पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. या नाट्याचा आज दुसरा अंक पंकजा यांनी सुरू केला आहे. याला धनंजय काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!