🕒 1 min read
मुंबई – पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 20 हिंदुस्थानी जवान शहीद झाले. आपले 20 जवान शहीद झाले आहेत यावरून काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सीमेवरच्या जवानांच्या हातात काठी कसली देता, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे का असा खोचक सवाल हुसेन दलवाई यांनी केला आहे. दरम्यान, चीनचे ४३ जवान आपल्या बहाद्दर जवानांनी यमसदनी पाठवल्याचा दलवाई यांना विसर पडल्याचे दिसून आले आहे. करण चीनचा एकही सैनिक ठार झाला नाही, आपलेच जवान शहीद झाले असा जावईशोध दलवाई यांनी लावला आहे.
#WATCH Congress' Husain Dalwai says, "…No one from their side died, only our jawans died…How can you send our jawans without arms? They could've fought but didn't get chance. They just had sticks. Is this RSS shakha? Why send soldiers? Send RSS people. They'll guard border." pic.twitter.com/5XVGyFLV6I
— ANI (@ANI) June 19, 2020
हुसेन दलवाई नेमकं काय म्हणाले –
घुसखोरी किती प्रमाणात झाली आहे, याची माहिती संपूर्णपणे मिळणे आवश्यक आहे. यामध्ये देशाला विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र एक गोष्टी ही देखील आहे की, ते मोठ्याप्रमाणावर आतमध्ये आले आहेत. दुःखद बाब ही आहे की आपले २० जवान शहीद झाले आहेत आणि ते निशस्त्र गेले होते. चीनचे सैनिक देखील निशस्त्र आले होते असे सांगितले जात आहे. मात्र, ते खिळे व लोखंड बसवलेल्या काठ्या घेवून आले होते. त्या काठ्यांनी त्यांनी मारहाण केली. त्यांचा एकही सैनिक ठार झाला नाही, आपलेच जवान शहीद झाले, अनेकजण जखमी झाले.
जखमी झालेले आता लवकरात लवकर सीमेवर पुन्हा जातील असं सागंतिलं जात आहे. मात्र मला तसं वाटत नाही. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आपण आपल्या सैनिकांना निशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते व काही झालं असतं तर मी समजू शकतो. परंतु त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय आरएसएसची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात, आरएसएसच्या लोकांना तिथे पाठवा काठी घेऊन, ते सीमेची सुरक्षा करतील.”
दरम्यान, भारत-चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून सातत्यानं काही कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी देशाच्या भूमिका मांडल्या. त्यावेळी चीनने दावा केला की, गलवान खोरं हे कायमच चीनचं होतं, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
भारत-चीन तणाव : चीनच्या उलट्या बोंबा, वाचा काय म्हटलंय चीनने ?
भारत-चीन सीमेवर चकमक; एक अधिकारी, भारताचे दोन जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला , तीन भारतीय जवान शहीद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
