Share

भारत-चीन सीमेवर चकमक; एक अधिकारी, भारताचे दोन जवान शहीद

Published On: 

मुंबई : भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. या झडप भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. या झटापटीत चीनचे काही जवान ठार झाल्याचंही म्हटलं जात आहे.

भारत आणि चीन यांच्यातील तडाखच्या सीमेवरील सुरू असलेले वाद कमी होण्याचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस तिथे अधिक तणावाचं वातावरण होत आहे. सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी झालेल्या वादातून भारताचे 3 जवान शहीद झाले.

दोन्ही देशांमधील सैन्यात तुफान दगडफेक आणि मारहाण झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी यासंबंधी घटनास्थळी बैठक घेत असल्याची माहितीही लष्कराने दिलीये. भारतीय सैनिकांकडून सीमा ओलांडून चीनी सैनिकांवर हल्ला केला, अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये लढत आहेत. चिनी सैनिक मोठ्या संख्येने येथे आले होते. दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होती. दोन्ही देशांकडून सैन्य माघार घेतल्याच्या बातम्या आल्या असून हा तणाव लवकरच संपेल असा विश्वास होता मात्र या घटनेमुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे.

‘अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले’

हा १९६२चा नाही २०२०चा नवा भारत आहे, चीनला थेट धमकी

धक्कादायक : पाकिस्तानच्या इस्लामाबादमधून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!