नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी १७ जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या २० झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे ४३ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुखांची दोनवेळा चर्चा केली.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉइंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र भारतीय लष्कर वा परराष्ट्र मंत्रालयाने आपले एकूण २० जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार
दरम्यान, चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनुआने दिलेल्या वृत्तानुसार पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA)चे पश्चिम थिएटर कमांडचे प्रवक्ते चांग शुई ली यांच्या अधिकृत व्हिबो अकाऊंटवर त्यांचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि वाद संपुष्टात आणण्यासाठी संवादाचा योग्य मार्ग अवलंबून पुढे जाण्याबद्दल म्हटलं आहे.
भारतीय सैनिकांनी आपलं वचन मोडलं आणि पुन्हा एकदा LAC ओलांडली. चीनी सैन्याला मुद्दामून डिवचण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन्ही बाजूंदरम्यान समोरासमोर झटापट झाली आणि यामुळेच जीवितहानी झाली. भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि चर्चेद्वारे हा वाद सोडवण्यात यावा अशी मागणी मी करतो. अस चांग यांनी म्हटलंय.
राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

