पुणे : अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या अडचणी अजून देखील संपलेल्या नसून परीक्षेच्या तोंडावर संभ्रमता वाढत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा होऊन निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात बॅकलॉग व त्यानंतर रेग्युलर विषयांच्या परीक्षांचे आयोजन केले जाईल असे सांगितले जात होते.
मात्र ऑक्टोबर महिना सुरु झाला असतानाच अजूनही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना तयारी कशी करावी? असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे परीक्षांचा हंगाम असलेल्या एप्रिल-मे महिन्यातदेखील लॉकडाऊन करण्यात आले होते. अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐन तोंडावर आल्या असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी संपाचं धोरण अवलंबलं आहे. हे आंदोलन तूर्तास स्तहगीत करण्यात आलं असून मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबर पासून आंदोलन पूर्ववत करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने दिला आहे.
24 सप्टेंबरपासून राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. ‘सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवीत करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि इतर प्रलंबित मागण्या’, या मागण्यांच्या पुर्ततेचं जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक कृती समितीने घेतला आहे. तर, हे कर्मचारी अधिक आक्रमक झाले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी काम बंद पुकारलं होत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर अखेर गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
हे आंदोलन आता स्थगित झाले असल्याने विद्यार्थ्यांना अंशतः दिलासा मिळाला आहे. पण परीक्षांचे नियोजन कसे असणार? त्याचे वेळापत्रक कधी येणार? तसेच जर या संघटनांनी पुन्हा १९ ऑक्टोबरला आंदोलन पुकारले तर विद्यापीठ कशा पद्धतीने ते हाताळणार यावर मात्र साशंकताच आहे.
महत्वाच्या बातम्या : –
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाइंचे मुंबईत आंदोलन,आठवले घेणार युपीच्या राज्यपालांची भेट
- उत्तर प्रदेशात जंगलराज; पोलीस फक्त तमाशा पाहत बसले आहेत : हार्दिक पटेल
- मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील
- ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना अतिशय निंदनीय वागणूक दिली’ – शरद पवार


