Share

हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाइंचे मुंबईत आंदोलन,आठवले घेणार युपीच्या राज्यपालांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अवघ्या 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवार दि. 1 ओक्टंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबई आजाद मैदान सी एस टी येथे केंद्रिय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले यांच्या उपस्थितीत व मुंबई अध्यक्ष युवक आघाडीचे रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

हाथरस येथील पीडित दलित मुलीच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा ; पीडित मुलीला न्याय देण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे; पीडित मुलीच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकार ने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि युपीच्या राज्यपालांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

https://twitter.com/HardikPatel_/status/1311605937623363585?s=20

काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तर राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनाही ट्विटवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ‘उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं’ म्हणत योगी सरकारला झापले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!