Share

केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक

Published On: 

नवी दिल्ली: २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारने प्रत्येक मुलासाठी मूलभूत शिक्षण उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सरकारने बजेटमध्ये बेघर मुलांसाठी बोर्डिंग स्कूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (DCPCR) च्या गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार, दिल्लीत ७० हजारांहून अधिक बेघर मुले आहेत. यातील हजारो मुलांना भीक मागण्यास भाग पाडले जाते. मात्र दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे या बेघर मुलांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी घेतलेल्या या निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांनीही ट्वीट करत कौतुक केले आहे. “मी कौतुक करू इच्छितो अरविंद केजरीवाल भाई आणि मनीष सिसोदिया यांचे. बेघर मुलांच्या बोर्डिंग स्कूलसाठी उपक्रम दिल्ली बजेट २०२२ मध्ये जाहीर केला आहे. सर्वात दुर्लक्षित मुलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हॅपीनेस अभ्यासक्रम सुरू करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो.”, असे ट्वीट कैलाश सत्यार्थी यांनी केले आहे.

रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर, फ्लायओव्हरवर, पायऱ्यांखाली, प्रार्थनास्थळे, मंडप, रेल्वे फलाटांवर राहणारी ही मुले निवारा, शिक्षण आणि अन्नापासून वंचित आहेत. या मुलांना निवारा, अन्न आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दिल्ली सरकारने बोर्डिंग स्कूल स्थापन करण्याची घोषणा केली. ही शाळा आधुनिक सुविधांनी युक्त बोर्डिंग स्कूल असेल. बेघर मुलांना शाळेत राहण्याबरोबरच शिक्षण आणि जेवणाचीही सोय होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

“किरीट सोमय्या त्यांचं आंदोलन करण्यास समर्थ”-  चंद्रकांत पाटील

तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला; ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचा राऊतांना टोला

…त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सर्वांनी पाहावा- अमित शहा

‘पाणी वाचवा’ मोहिमेत मोदींना मुलांकडून अपेक्षा; ‘Water Warrior’ म्हणत केले ‘हे’ आवाहन

बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती भाजपच्या ‘मैत्रीण’- संजय राऊत


बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!