Share

आम्ही जे सांगतो ते करुन दाखवतो; मोदींचे शब्द पोकळ – राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: ‘जे तुम्हाला खोटी आश्वासने देतात, खोटी स्वप्ने दाखवतात त्यांच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. काँग्रेस पक्ष जे सांगतो ते करुन दाखवतो. नरेंद्र मोदींचे शब्द पोकळ असतात. ते जे बोलतात ते करीत नाहीत,’ अशी घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान बेल्लारी येथे ते बोलत होते.

संसदेतील आपल्या एक तासाच्या लांबलचक भाषणात नरेंद्र मोदी देशाच्या भविष्याबाबत, तरुणांच्या रोजगाराबाबत किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला तास केवळ काँग्रेस पक्षावरील टीकेवर आणि भूतकाळातील गोष्टी सांगण्यातच घालवला. देशाला यात रस नाही, तर आपल्या पंतप्रधानाकडून देशाच्या भविष्याबाबत ऐकण्यात रस आहे. असा घणाघात सुद्धा राहुल गांधी यांनी केला. ते चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून या दरम्यान ते बेल्लारी, कोपल, रायचूर, गुलबर्गा आणि बदर येथे प्रचार सभा घेणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!