Share

सर्वसामान्यांना दिलासा नाहीच! पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ

Published On: 

नवी दिल्ली : सततच्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 0.35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून नागरीकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.  तर चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

दरम्यान, सततच्या वाढत्या किमतीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती आधीच शंभरी पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलने देखील काही भागात शंभरी गाठली आहे.

कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!