नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे.बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील उपस्थित होते.
हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचं अंतर कापावं लागत होतं. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतकं झालं आहे.आपल्याला देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवायचं असून त्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअतर्गत स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यामुळे सर्व हंगामात जवानांना वेळेत रसद पोहोचविण शक्य होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
प्रारंभी 950 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून सुरु करण्यात आलेल्या या कामासाठी ३ हजार दोनशे कोटी रुपये खर्च आला. मात्र, जनतेसाठी रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं हे आपल्या सरकारचं प्रथम प्राधान्य असल्याचं मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्याला पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर ‘हे’ करावेच लागेल’
- विवेकचे आत्मबलिदान निश्चितच वाया जाऊ देणार नाही- विनोद पाटील
- अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका,योगींच्या राजीनाम्याची प्रियांका गांधींची मागणी
- अयोध्येनंतर काशी,मथुरेची चर्चा;पवारांना वाटतेय ‘ही’ भीती
- शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल – दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

