मुंबई : हाथरस येथील कथित बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निघाल्या होत्या. यावेळी युपी पोलिसांनी प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली आणि नोएडा फ्लाय ओव्हरवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचा कुर्ता खेचताना दिसत आहे. या प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट करत म्हटलं की, योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का ? दरम्यान, उत्तरप्रदेश पोलीसांनी नुकतेच काँग्रेस नेते राहुल राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याची घटना ताजी असताना प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलंय, त्यामुळे संपूर्ण देशातुन योगी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है? pic.twitter.com/nBx6YnQc9Q
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 3, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- विवेकचे आत्मबलिदान निश्चितच वाया जाऊ देणार नाही- विनोद पाटील
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन
- देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार- मोदी
- शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल – दरेकर
- मोठी बातमी : कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान


