Share

देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार- मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली-  आपल्याला देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवायचं असून त्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअतर्गत स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यामुळे सर्व हंगामात जवानांना वेळेत रसद पोहोचविण शक्य होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीवरील जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन आज काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी 950 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून सुरु करण्यात आलेल्या या कामासाठी ३ हजार दोनशे कोटी रुपये खर्च आला. मात्र, जनतेसाठी रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं हे आपल्या सरकारचं प्रथम प्राधान्य असल्याचं मोदी म्हणाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, हिमाचल प्रदेश येथील कुल्लु मनाली आणि लाहौल-स्पिति जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या 9 किलोमीटर लांब या बोगद्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून सुरु होतं. हिमवर्षावातही रहदारी खुली राहणार आहे.

हा 9 किलोमीटर लांब बोगदा, मनालीला वर्षभर लाहौल-स्पिति खोऱ्यांशी जोडून ठेवणार आहे. याआधी खोऱ्यातील गावांचा दरवर्षी जवळपास 6 महिन्यांपर्यंत बर्फवृष्टीमुळे इतर शहरांशी संपर्क तुटत होता. आता ‘अटल टनल’मुळे ही समस्या दूर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!