Share

‘मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये अजून एकाही रुग्णावर उपचार झाला नाही’

Published On: 

मुंबई – मुंबई विभागात दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना शासनाकडून वैद्यकीय काही जम्बो फॅसिलिटी उभारण्यात आल्या. त्यातील एक महानगर पालिका व सिडको यांच्या संयुक्त नियोजनातून एल.बी.एस.मार्ग, रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी मुलुंड येथे तात्पुरत्या स्वरूपात कोविड १९ हॉस्पिटल उभारण्याचे निश्चित झाले, त्या अनुषंगाने सिडकोने सर्व हॉस्पिटल चे काम पूर्ण करून महानगर पालिकेकडे रुग्णांच्या सेवेकरिता सुपूर्द केले. या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले असे जाहीर करून दिनांक ७ जुलै रोजी याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येथील सेवा-सुविधांची पाहणी करण्याकरिता या हॉस्पिटल मध्ये भेट दिल्यानंतर तेथील व्यवस्था पाहून धक्का बसला असल्याचं सांगितले आहे. लोकार्पण झाल्यानंतर तेथे अजून हि कोणतीही वैद्यकीय टीम उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे अद्याप एकाही रुग्णावर उपचार सुरु झालेले नाही. तसेच या हॉस्पिटल मध्ये सिडको ने दिलेल्या कार्यादेशानुसार या हॉस्पिटल मध्ये सुमारे ११ कोटी खर्च करून १५६० आयसोलेशन बेड, २१५ आय.सी.यु. बेड, ७५ डायलिसिस बेड ची व्यवस्था ८ जून २०२० पर्यंत पूर्ण करायची होती. आज एक महिना पूर्ण झाला आहे परंतु आय.सी.यु. व डायलिसिस बेड याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही असा कोटेचा यांनी आरोप केला आहे.

कोटेचा म्हणाले,आज अनेक रुग्ण तातडीने उपचार मिळावे म्हणून नाईलाजाने खाजगी हॉस्पिटल मध्ये भरमसाठ रक्कमेची बिले भरून उपचार घेत आहेत. बेड सोबत व्हेंटीलेटरही सुद्धा काळाची गरज असताना मुलुंड मधील रुग्णांकरिता ४५ व्हेंटिलेटर ची व्यवस्था महापालिके कडून टी वॉर्ड करीता करण्यात आली, परंतु हे व्हेंटिलेटर अजून ही धूळ खात पडलेले आहे. हे ४५ व्हेंटिलेटर व कोविड सेंटर मधील आय.सी.यु. व डायलिसिस बेडची व्यवस्था वेळेत झाली असती तर आज अनेक लोकांचे प्राण वाचवू शकलो असतो.

कोटेचा म्हणाले,मुंबईत जम्बो फॅसिलिटी हे सफेद हत्ती आहेत. अजून पर्यंत शासनाद्वारे कोट्यावधी रुपये खर्च करून उभे करण्यात आलेले हे सर्व जम्बो फॅसिलिटी हा मोठा घोटाळा आहे. पी.एम. केयर फंड मधून ४०० व्हेंटिलेटर मुंबईसाठी आले ते तसेच पडलेले आहेत. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते काहीच उत्तर देत नाहीत. या सर्व बाबी मधून शासनाची दिशाहीनता, लोकांना सुविधा देण्यात असमर्थता दिसून येते.

मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी आहे की कोविड सेंटर मध्ये तातडीने वैद्यकीय टीमची नियुक्ती करण्यात यावी तसेच कंत्राटदारांकडून आय.सी.यु. बेड व डायलिसिस बेड ची व्यवस्था तातडीने करण्यात यावी जेणे करून हे सेंटर संपूर्ण सोयी सुविधांसह नागरिकांकरिता खुले करावे तसेच कोविड सेंटरच्या कामात व व्हेंटिलेटरच्या कामात दिरंगाई करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, वॉरन बफेंना मागे टाकत पोहचले ‘या’ क्रमांकावर

एका लग्नामुळे ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, तर नवरदेवाला २५ हजारांचा दंड!

‘या’ तारखेपासून होणार मराठा आरक्षणवर नियमित सुनावणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!