Share

अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

Published On: 

🕒 1 min read

न्युयोर्क- अमेरिकेने ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय रद्द केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प यांनी एक आठवड्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अनेक शिक्षण संस्था आणि अनेक राज्यांनी विरोध केला होता.

या निर्णयाला काही राज्यांनी कोर्टात आव्हानही दिले होते. अमेरिकेत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यानी येथे राहण्याची गरज नाही अशी भूमिका अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतली होती. हा निर्णय अन्यायकारक आहे असे अनेक राज्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास केवळ चीनच जबाबदार असून संयुक्त राष्ट्रासंघानं चीनला अकारण पाठीशी घातलं आहे, या आपल्या भूमिकेचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पत्रकार परिषदेत पुनरुच्चार केला आहे.

हॉंगकॉन्गमधील दडपशाही, भारतीय जवानांवर हल्ला, लडाखमध्ये घुसखोरी, दक्षिण चीन समुद्रातली शिरजोरी या सगळ्यातून चीनची कम्युनिस्ट पार्टी कशा प्रकारे काम करत आहे, हे स्पष्ट दिसत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे.
भारत आणि अमेरिका संबंध अतिशय सौहार्दपूर्ण असून दोन्ही देशांमधील मैत्रीचा आम्ही आदर करतो, असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. चीनची भारताशी वर्तणूक अतिशय अयोग्य असून आम्ही भारताच्या बरोबर आहोत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, वॉरन बफेंना मागे टाकत पोहचले ‘या’ क्रमांकावर

एका लग्नामुळे ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, तर नवरदेवाला २५ हजारांचा दंड!

‘या’ तारखेपासून होणार मराठा आरक्षणवर नियमित सुनावणी

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कधी श्रेयासाठी काम करत नाही,हे काम ट्रोल्स करत असतात’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!