Share

एका लग्नामुळे ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, तर नवरदेवाला २५ हजारांचा दंड!

Published On: 

वर्धा: राज्यासह देशात कोरोनाचा कहर हा सुरूच आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांसह शहरांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. काही जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या हि जास्त असून तेथे होणारे लग्न समारंभ हे कारणीभूत ठरत असल्याचे आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जुन्नर भागात लग्नामुळे  ३५ वऱ्हाडीना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यात फक्त २० लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्यात येत होती.

आता अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. या लग्नात खुद्द नवरदेव व नवरीसह अन्य सात जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या एका लग्नामुळे सात ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या लग्नाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. याशिवाय आता वर्ध्यात लग्न समारंभासाठी फक्त 20 नातेवाईकांना सहभागी होता येणार आहे, अशी बातमी टीव्ही ९ वाहिनीने दिले आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कधी श्रेयासाठी काम करत नाही,हे काम ट्रोल्स करत असतात’

तर पिपरी गावातील या लग्न सोहल्याप्रकरणी आता प्रशासनाकडून नवरदेवाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नवरदेवाने लग्नाआधी कुठलीही परवानगी न घेता कंदुरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय कंदुरीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरांचा प्रशासनाकडून शोध सुरु आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पिपरी येथील एका लग्नामुळे वर्ध्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तातडीने लग्न सोहळ्याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.

मंत्र्याच्या मुलाला अद्दल घडविणाऱ्या कॉन्स्टेबल सुनिता यादव म्हणतात मी कुणालाही घाबरत नाही

या नव्या नियमावलीनुसार लग्नात आता 20 पेक्षा जास्त नातेवाईक सहभागी झाल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  तर आता नव्या नियमावली नुसार, लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येक नातेवाईकाला 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील. दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना लग्न सोहळ्यात सहभागी होता येणार नाही (अपवाद फक्त वर किंवा वधु आणि त्यांच्यासोबत 4 व्यक्ती ).

नियमावलीचं पालन करत ‘या’ मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

विवाह सोहळ्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती उपस्थित राहिल्यास आयोजकांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. याशिवाय आयोजकांकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. तसेच विवाहस्थळी विवाहस्थळी संबंधित तहसीलदार एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करतील. तसेच तहसीलदारमार्फत परवानगी प्राप्त यादी व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती उपस्थित राहील्यास, अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!