बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरु केलं आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तूपकर यांनी नागपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरी बुलढाण्यामध्ये सोडलं होतं. मात्र तरीही तूपकरांनी आपलं अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये शांतता मार्गाने अन्नत्याग सत्याग्रह करत होतो. माझ्यासोबत अनेकजण सहभागी होते. नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करुन आणि कलम 144 लागू असल्याचं सांगून आम्हाला अटक केली. शांततेच्या मार्गाने 18, 19 आणि 20 या तारखेला आंदोलन करणे हे ठरल्याप्रमाणे सुरु होते. 18 तारखेला प्रभात फेरी, 19 तारखेला चक्काजाम आणि 20 तारखेला गावबंद अशाप्रकारे आंदोलन करा, कुठेही कायगदा हातात घेऊ नका, असं सर्व कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन केलंय, असं रविकांत तूपकर यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांची औलाद आहे…दडपशाहीला भीक घालणार नाही..अन्नत्याग सत्याग्रह सुरूच राहणार…@abpmajhatv pic.twitter.com/7UcgEfu7ai
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) November 18, 2021
दरम्यान, तूपकर यांच्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई करत त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आलं मात्र तरीही ते आपल्या अन्नत्याग सत्याग्रहावर ठाम असल्याचं रविकांत तूपकर यांनी ट्वीट करत सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
- तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
- तुमचं सगळं चमचा मंडळ धुतल्या तांदळाचं आहे काय?- संजय राऊत
- आधी तक्रारींचे निराकरण मगच नियुक्त्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार


