Share

‘दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नसून यासाठी…’, कंगनाच्या टीकेवर तुषार गांधींचे प्रत्युत्तर

Published On: 

नवी-दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा,असे वक्तव्य कंगनाने केले होते.

दरम्यान, यावर उत्तर देत तुषार यांनी एक लेख लिहिला असून ‘दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते’ असे या लेखाचे शीर्षक आहे. यात ते म्हणाले आहेत की,’गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात असा आरोप करणारे भित्रट असून यासाठी लागणारं धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये.’ तसेच दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागतं आणि हे त्यावेळीच्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात दाखवून दिलं होतं. ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते. बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचं स्वागत करतील. आपल्या देशासाठी, लोकांसाठी त्यांची भीक मागायला हरकत नव्हती. ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचंही त्यांनी कौतुक केलं होतं. पण शेवटी याच फकिरासमोर ब्रिटीश राजवट अखेर शरण आली, असेही तुषार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!