Share

मुंबईतून बॉलिवूड कोणीही अन्यत्र हलवू शकत नाही –  रामदास आठवले

Published On: 

मुंबई  – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.उद्योगनगरी आहे.अनेक उद्योगांप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या उद्योगाला अनुकूल आहे.त्यामुळे मुंबईतून सिने उद्योग अन्यत्र कोणी हलवू शकत नाही. उत्तर प्रदेशात बॉलिवूड सारखा चित्रपट उद्योग उभा करण्याचा प्रयत्न चांगला आहे. पण मुंबईच्या बॉलिवूडने जगात आपला ठसा उमटवला आहे.त्यामुळे मुंबईतून बॉलिवूड अन्यत्र कोणीही हलवू शकणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक रिक्षा चे उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आदी अनेकमान्यवर उपस्थित होते.आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा ; मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!