लखनऊ : लखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना तेथील प्रदेश पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. सकाळी यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ठिय्या आंदोलनाला बसले होते यादरम्यान त्यांच्या आंदोलनस्थळापासून काही अंतरावर असलेल्या गौतमपल्ली पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या जिप्सीला लाग लावण्यात आली आहे. हिंसाचार जास्त वाढू नये यासाठी पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.
रात्री उशिरा प्रियांका गांधी लखनऊ येथे पोहोचल्या होत्या. यावेळी पोलिसांशी त्यांची झटापटही झाली होती. लखनऊच्या विक्रमादित्य मार्ग परिसरातच गौतमपल्ली पोलीस ठाणे आहे. तेथेच अखिलेश यादव यांचे घर आहे. ते घरासमोरच ठिय्या आंदोलन करत होते. दरम्यान जिप्सीला लागलेली आग तातडीने विझवण्यात आली आहे. या जिप्सीला आग लावली तेव्हा सर्व पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात होते. मात्र अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच आक्षेप घेतला आहे. ही आग पोलिसांनीच लावली असावी, हिंसेचे कारण देत आंदोलनाला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असे अखिलेश यादव म्हणाले.
याठिकाणी समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली आहे. तर अखिलेश यादव समर्थकांसह धरणेवर बसले होते. यावेळी त्यांनी भाजपचा आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, भाजप सरकारमध्ये ब्रिटिशांपेक्षा शेतकऱ्यांवर जास्त अत्याचार झाले. सरकार कोणालाही मारू शकते. लखीमपूर प्रकरणात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तर अखिलेश यादव यांनी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना २ कोटी द्यावेत अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
