Share

‘कितीही प्रयत्न करा मुंबई महानगरपालिकेवरुन शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही’

Published On: 

मुंबई : काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले पण, वाघासमोर काही चालतं का? कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेवरुन शिवसेनेचा झेंडा उतरवणे शक्य होणार नाही, असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे. ते मुंबईतील विक्रोळी येथे छत्रपती संभाजी महाराज मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होणार आहे. असे निर्देश निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपासह इतर पक्ष तयारीला लागले आहेत, बैठकांना वेग आला असून नेते विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेनेवर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत काल माहिती दिली. एकंदरीत महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे भाजपाचे प्रयत्न चालल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

सध्या मुंबईतील अनेक प्रश्नांवर भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यावर अनेक मुद्द्यांसह गत निवडणुकीत दिलेल्या अश्वासनांवरुन भाजपा नेते निशाना साधत आहेत.

यावर मुंबई बीजेपी या ट्विटर हँडलवरुन टीका करण्यात आली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्याचे अश्वासन शिवसेनेने दिले होते. हे अश्वासन हवेत विरले त्याचप्रमाण फेरीवाल्यांसाठी निश्चित धोरण आणि वेशेष क्षेत्र तयार करण्याचे अश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस विसरले पण मुंबईकर तुम्ही दिलेली ही अश्वासने विसरलेले नाहीयेत. अशी टीका शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपाने केली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!