मुंबई : पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता 25 मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
शासकीय नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजेच 25 जून 2004 च्या नियमानुसार करण्यास मंजुरी देणारा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना शासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयावर आता टीका होऊ लागली आहे. यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. महाविकासआघाडी सरकार फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सरकार आहे. ज्यांच्या ताटात काही नाही त्याला आरक्षणाची संधी देऊन समानतेच्या दर्जा पर्यंत पोहचवायचे असते हे कार्य पूर्वीच शाहू महाराज यांनी केले आहे आता या महाविकासआघाडी सरकारने तात्काळ मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीतील आरक्षण मिळण्यासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
आमदार कपिल पाटील यांनी देखील एक ट्वीट करत सरकारवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र शासनाने जीआर काढून पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि मागासवर्गीयांचा बळी द्यायचा. हा कोणता सामाजिक न्याय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान,दुसऱ्या बाजूला या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. तमाम शासकीय मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील हक्काच्या 33 टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा शासन निर्णय त्वरित घ्यावा याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविणार आहोत असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

