Share

राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?

Published On: 

मुंबई : राज्यात सापडलेल्या युरेनियम प्रकरणातील तपास एनआयए करत आहे. यावरुन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर राज्याच्या तपास यंत्रणांवर दडपण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या संदर्भात केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल तीन महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास एनआयएने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी काय.. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?’

युरेनियमचा साठा राज्यात सापडल्यामुळे मोठी भीती निर्माण झाली होती. या प्रकरणी एनआयए तध्या तपास करत आहे. मात्र, यावरुन भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. यात महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा केल्याचा आरोप भाजपच्या वतीने केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!