मुंबई: कोकणातील प्रकल्पावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरु झालं आहे.सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत,अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारचा हा प्रकल्प दोडा मार्गावरील आढाळी येथे उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाने त्याला मंजुरीही दिली आहे. मात्र, अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलविण्याची मागणी केल्याने त्याला शिवसेना आक्रमक झाली आहे.
‘अमित देशमुख यांनी केली मागणी ही योग्य नाही. त्यामुळे ही बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयुष मंत्रालयाकडून याबद्दल विचारणा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गातच व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे, असंही विनायक राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
- मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे होणार सुशोभीकरण
- खरा शेतकरी कशाला फिरकेल राहुल गांधींच्या बोगस आंदोलनाकडे?
- ‘राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार’
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- ‘रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर मला २० वर्षापूर्वी जशी तब्येत होती, अगदी तसेच वाटतंय’


