मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नितीन राऊत म्हणाले की,‘भारत हा विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा देश असून देशाला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. लोक धर्मासंदर्भात अशी विधाने करतात, हे खरोखरच खेदजनक आहे, यातून त्यांची मानसिकता दिसून येते’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- मोदी सरकारकडून गोरगरीबांची लूट सुरुच- नाना पटोले
- “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
- ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाहचं पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक
- IPL 2022 RR vs RCB : विराट विरुद्ध चहल; दोन संघांपैकी कोणाचं पारडं जड? वाचा!
- “…तर पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा राज ठाकरेंना बेड्या ठोका”, ‘वंचित’ची आक्रमक भूमिका


