Share

भाजपचे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान; नितीन गडकरींनी घेतली सलमानची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनेता सलमान खान याची भेट घेतली. मुंबईतील सलमानच्या घरी ही भेट झाली. संपर्क फॉर अभियानात भाजपचा मुख्य फोकस आहे बौद्धिक वर्तुळावर. विशेषतः या वर्तुळावर डाव्या विचारांचा प्रभाव अधिक आहे.

सरकारविरोधात जास्तीत जास्त ओरड करणारा, संघाच्या विचारसरणीला घातक मानणारा हाच वर्ग आहे. चित्रपट कलावंत, साहित्यिक, न्यायमूर्ती, प्राध्यापक अशा वर्गामध्ये भाजपला ताकदीचे उजवे समर्थक मिळत नाहीत. त्यामुळेच कदाचित या माध्यमातून आपली विचारसरणी ठसवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न आहे.

 

         काय आहे भाजपचे ‘संपर्क फॉर समर्थन अभियान’

हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता.त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!