Share

नितीन गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींना उत्तम पर्याय : सुब्रमण्यम स्वामी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप कडून पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळेस देखील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचीच वर्णी लागणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. मात्र आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये भाजप मधूनच स्पर्धा लागली असल्याच दिसत आहे. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात असे वक्तव्य भाजप वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, भाजपने २३० अथवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३० जागा मिळाल्या. तर हा आकडा २५० पर्यंत पोहचेल. तरीपण आम्हाला ३० जागांची गरज असेल, असे त्यांनी सांगितले.

या स्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील का? या प्रश्नावर स्वामी म्हणाले, हा निर्णय एनडीएमधील इतर मित्रपक्षांवरही अवलंबून असेल. ३० अथवा ४० जागांचे असणारे मित्रपक्ष यांनी समर्थन दिले नाही तर मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत. मात्र पंतप्रधान मोदींना नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतील, असे ठाम मत स्वामींनी यावेळी व्यक्त केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!