🕒 1 min read
नवी दिल्ली: जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत.
यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने बेंगळुरुतील 21 वर्षीय क्लायमेट अ;ॅक्टिव्हिस्ट दिशा रविला अटक केली आहे. या प्रकरणातील भारतातील ही पहिली अटक आहे. दिशा रवि ही फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनची संस्थापक सदस्य आहे. 4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी टूलकिट संदर्भात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. टूल किट प्रकरणातील ही पहिली अटक आहे. दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी संपादन केली आहे. दिशा सध्या गुड माइल्ड कंपनीशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा तिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली तेव्हा ती घरून काम करत होती.
Activists in jail while accused terrorists are on bail. Wondering how our authorities would commemorate this case on the anniversary of Pulwama Attacks? You have the answer in this pair of headlines. pic.twitter.com/lkft38pNBj
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 14, 2021
यानंतर आता कोन्ग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. ‘कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल’ असं म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शशी थरूर यांनी जम्मू-काश्मीरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. देविंदर सिंह यांच्या फोटोसह दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ‘कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर… आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?. खालच्या दोन शीर्षकांमध्ये उत्तर मिळेल’ असं शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ते जामिनावर बाहेर आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोनाचा धोका वाढतोय, पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या 2012 रुग्णांची नोंद
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
