🕒 1 min read
लातुर : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जिल्ह्यात तिन्ही सैन्यदलांचे भरती मेळावे भव्य स्वरुपात घेण्यात यावे, अशी मागणी खासदार सुधाकरराव श्रृंगारे व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना केली आहे. या संदर्भात त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना निवेदन दिले आहे.
दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला फारसे उत्पन्न मिळत नाही. तसेच जिल्ह्यात मोठ्या उद्योगधंद्यांची कमतरता आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीत सैन्यदलातील नोकरी ही स्थानिक तरुणांसाठी मोठी संधी ठरू शकते. असे आमदारांनी निवेदनात सांगितले आहे. लातुर जिल्ह्यात दशकभरापासून दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाला पाणी उपलब्ध नसते. पाण्याच्या कमतरतेमुळे येथील उद्योग इतर जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला.
कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतर शहरात रोजगार करणारे अनेक जण याकाळात गावी परतले आहे. या कामगार आणि तरुणांना सामावून घेऊ शकतील असे उद्योगधंदे जिल्ह्यात नसल्याने सैन्यात भरतीसाठी जिल्ह्यातील तरुण उत्सुक आहेत. अशा तरुणांना संधी मिळली तर हजारो तरुणांना आपले राष्ट्रसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तीनही सैन्यदलांचे भरती मेळावे व्यापक स्वरूपात लातूर जिल्ह्यात आयोजित करावेत. यातून संरक्षणमंत्र्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही खा.शृंगारे व आ.निलंगेकर यांनी या निवेदनात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोनाचा धोका वाढतोय, पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या 2012 रुग्णांची नोंद
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
