टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे स्टेशनवर इथून पुढे मातीच्या पेल्यात म्हणजेच कुल्लडमध्ये चहा मिळणार असल्याची घोषणा केली आहे. प्लास्टिक कपमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आणि कुंभारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
या उपक्रमाबाबत गडकरींनी रेल्वे मंत्री आणि सर्व राज्यांच्या वाहतूक सचिवांना प्लास्टिक आणि कागदी कपाऐवजी मातीचे भांडे (कुल्लड) देण्याची मागणी केली आहे. यातून कुंभार काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असंही गडकरींनी नमूद केलं आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत ही गडकरी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, तुम्ही नियम तोडाला नाही, तर फाईन भरण्याचं काम नाही. वाहतुकीचे नियम कठोर होणे आवश्यक आहे.
दरम्यान सध्या बहुतांशी ठिकाणी चहा देण्यासाठी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. या बाबी लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी कुल्लड चहाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे. तसेच मातीच्या पेल्यात चहा पिण्याचे अनेक फायदेही आहेत. त्यामुळे सध्या मातीच्या पेल्यातील चहाच्या मागणीतही वाढ होत आहे. लोकही कुल्लडमधून चहा पिण्यास प्राधान्य देत आहेत.
- ‘माझी लढाई व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीच्या माणसांच्या भल्यासाठी’
- कॉंग्रेस सोबत युती करणार नाही, एमआयएमसोबत युतीसाठी शेवटपर्यंत वाट पाहाणार’
- चांद्रयान 2 : ‘विक्रम’ लँडर हे सुस्थितीत, संपर्क जोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु – इस्रो
- पंतप्रधान मोदींच्या आणि देशातील जनतेच्या पाठींब्यामुळेचं वैज्ञानिकांचे मनोधैर्य उंचावले : के सिवन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

