मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन केलं.
यासोबतच, पंतप्रधानांनी काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय असं भाष्य करत मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने मध्यस्थी करावी व हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे करत असलेल्या मागण्यांवरून भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..
आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त..
????????????
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 5, 2021
उद्धव ठाकरेंच्या कालच्या संबोधनानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी चिथावणी देणाऱ्या सहकाऱ्यांना समजवावं; चव्हाणांचा इशारा
- हैद्राबादेत आठ सिंह कोरोना पॉझिटिव्ह, औरंगाबाद प्राणिसंग्रहालय सतर्क!
- लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- कर्नाटकने अडवलेला ऑक्सिजन पुरवठा केंद्राने मध्यस्थी करून सुरळीत करावा – सतेज पाटील


