औरंगाबाद : काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयात सिंहाना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सिध्दार्थ प्राणिसंग्रहालय सतर्क झाले असून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. पिंजर्यात प्रवेश करणार्या केअर टेकरला आधी पाय पोटॅशिअम पॅरमॅग्नेटच्या पाण्यात निर्जंतुक करण्याची सक्ती केली आहे. त्यानंतरच त्यास आत प्रवेश दिला जात आहे. तसेच प्राण्यांच्या शरीराचे तापमान रोज मोजले जात आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे सल्लागार डॉ. बी.एस. नाइकवाडे यांनी बुधवारी (दि.५) दिली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने सतर्क झाली आहे. प्राणिसंग्रहालयात सध्यस्थितीत १५ वाघ आहेत. त्यांच्यासह बिबटे व इतर प्राण्यांचीही काळजी घेतली जात आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी दहा प्रमुख उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्राण्यांच्या संपर्कात येणार्या केअर टेकरचे दररोज स्क्रिनिंग केले जात आहे. कर्मचार्यांना गणवेश, सॅनिटाझर, मास्क नियमितपणे वापरण्याचे बजावले आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील दिड वर्षापासून पालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र प्राणिसंग्रहालयातील वाघांसह अन्य प्राण्यांना कोरोनाची लागण येथे काम करणार्या कर्मचार्यांकडून होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गतवर्षी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात एका बिबट्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्राण्यांची काळजी घेतली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ग्रामीण भागात कोविड सेंटरचे दर जास्त’, आरोग्यमंत्री टोपेंना मेहबूब शेख यांचा घरचा आहेर
- सलमानच्या ‘ राधे ‘ सिनेमाची रक्कम कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी दिली जाणार
- ‘ग्रामीण भागात कोविड सेंटरचे दर जास्त’, आरोग्यमंत्री टोपेंना मेहबूब शेख यांचा घरचा आहेर
- डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधानामुळे अभिनेता सुनील पालच्याविरोधात तक्रार दाखल
- औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे; रितेश देशमुखचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

