Share

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यावर्षी दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडणार, ‘अशा’ आहेत सामन्यांच्या तारखा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आशिया चषकाला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान अ गटातील सलामीच्या लढतीत एकमेकांशी भिडतील. यावर्षीच्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही देश वारंवार आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. सुपर ४ टप्प्यात ते एकमेकांविरुद्ध खेळू शकतात आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही खेळू शकतात. पुढील काही महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ शकते.

आशिया चषक पर पडताच एका महिन्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ साठी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येतील. आशिया चषक २०२२ दुबई आणि शारजाह येथे २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत अ गटात पाकिस्तानसोबत असून तिसरा संघ हा क्वालिफायर झालेला असणार आहे. तर दुसरीकडे ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.

२८ ऑगस्ट रोजी दुबई येथे अ गटातील सलामीच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. यानंतर सुपर ४ टप्प्यात दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडण्याची दाट शक्यता आहे. युएईला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची गेल्या पाच वर्षांतील ही दुसरी वेळ असेल. २०१८ मध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळली जाणारी ही स्पर्धा १५-२८ सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आली होती.

मागील टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गाडी राखून मोठा पराभव केला होता. त्यामूळे आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कडवी झुंज देण्यासाठी तयार असेल. गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांनी जागतिक स्तरावर उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. या स्पर्धेत भारत कायमच सरस राहिला आहे. पण बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारताविरुद्ध चांगली कामगिरी करत विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता.

आशिया कप वेळापत्रक
२७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध पात्रता, दुबई
१ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुध्द पात्रता, शारजाह
३ सप्टेंबर – ब १ विरुध्द ब२, शारजाह
४ सप्टेंबर – अ१ विरुध्द अ२, दुबई
६ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब१, दुबई
७ सप्टेंबर – अ२ विरुध्द ब२, दुबई
८ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब२, दुबई
९ सप्टेंबर – ब१ विरुध्द अ२, दुबई
१० सप्टेंबर – फायनल, दुबई

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचे सामने
भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
भारत विरुद्ध गट अ उपविजेता, २७ ऑक्टोबर (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर (अ‍ॅडलेड)
भारत विरुद्ध गट ब विजेता, ६ नोव्हेंबर ( मेलबर्न).

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!